आजकाल फसवणुकीचे प्रमाण किती वाढले आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. विशेषत: सिमकार्ड(SIM Card) फसवणुकीची प्रकरणे तर दिवसेंदिवस वाढत आहे. सिम कार्ड फ्रॉड अशी फसवणूक आहे, जी शोधणे फार महत्वाचे आहे. अज्ञात व्यक्तींनी दुसऱ्या व्यक्तीच्या आधारकार्डवर मोबाइल सिमकार्ड देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या सिमकार्डचा वापर गुन्हेगार आर्थिक गुन्हे करण्यासाठी करत आहेत. परिणामी, तुमचा आधार केवळ तुमच्या नंबरशी जोडलेला आहे आणि दुसऱ्या स्कॅमरद्वारे वापरला जात नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. शिवाय, याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे नुकसान देखील होऊ शकते. तुम्हाला जर यापासून दूर राहायचे असेल तर , त्यासाठी तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर नोंदणीकृत आहेत हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर नोंदणीकृत आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
(DoT) चे संचार सारथी या संकेतस्थळद्वारे जाणून घेऊ शकता:
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (DoT) च्या संचार सारथी(https://sancharsaathi.gov.in) पोर्टलद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता. तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत हे इथून तुम्हाला कळू शकते . दूरसंचार विभागाच्या पोर्टलचे नाव ‘टेलीकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन’ (TAFCOP) आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या नियमांनुसार, एक नागरिक त्याच्या आधार कार्डवरून फक्त ९ मोबाईल क्रमांक जारी करू शकतो. तुम्हालाही तुमच्या आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे जाणून घ्यायचे असेल, तर या स्टेप्स फॉलो करा.
Step-1 : संचार साथी च्या वेबसाइटवर जा: www.sancharsathi.gov.in
Step-2 : आपल्या मोबाइल कनेक्शन्सबद्दल माहिती (KNOW YOUR MOBILE CONNECTIONS) मिळवण्यासाठी पर्याय निवडा.
आपल्याला एका नवीन पृष्ठावर नेले जाईल. सदर स्क्रीन खालीलप्रमाणे दिसेल
Step-3 : आपल्या दहा अंकी मोबाइल नंबर टाका.
Step-4 : कॅप्चा कोड टाका.
Step-5 : आपल्याला वरील मोबाईल नंबर वरती प्राप्त OTP टाका.
आपल्याला पुन्हा एका नवीन पृष्ठावर नेले जाईल.
खालीलप्रमाणे हे पृष्ठ आपल्या आधार कार्डाशी संबंधित मोबाइल फोनची यादी दर्शवेल.
सर्व सक्रिय नंबर आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांचे, जसे की पालक, भाऊ-बहिण आणि इतर कुटुंबीयांचे आहेत हे तपासा आणि सुनिश्चित करा.
कुठल्या शंका असल्याास, या वेबसाइटवर ३ पर्याय उपलब्ध आहेत: “Not My Number”, “Not Required” आणि “Required”.
आपल्या आयडीवर नोंदलेला परंतु आपल्या कुटुंबातील कोणालाही संबंधित नसलेला नंबर “माझा नंबर नाही” हा पर्याय क्लिक करून रिपोर्ट करू शकता.